नांदेड(प्रतिनिधी)-23 जानेवारीच्या मध्यरात्री एका 60 वर्षीय महिलेचा खून करून 3 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेणाऱ्या 5 दरोडेखोरांना पोलीसांनी पकडल्यानंतर रात्री उशीरा सहाव्या दरोडेखोराला अटक केली. आज 29 जानेवारी रोजी देगलूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती खान यांनी या सहा दरोडेखोरंाना आठ दिवस अर्थात 6 फेबु्रवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.23 जानेवारी रोजी श्रीपतराव पाटील आणि चंद्रकलाबाई रात्री 9 वाजता आपल्या घराचे मुख्य गेट बंद करून कुलूप लावून घरातच होते. चंद्रकलाबाई यांना टी.व्ही. पाहता-पाहता झोप लागली. श्रीपतराव पाटील त्यांच्या अगोदरच झोपले होते. रात्री 11.30 वाजेच्यासुमारास आपल्या गालावर काही वजन आहे. हे लक्षात आल्याने श्रीपतरावांना जाग आली. तेंव्हा एक व्यक्ती त्यांच्या गालावर पाय ठेवून उभा होता. दुसऱ्याने त्यांचे पाय लुंगीने बांधून टाकले. चंद्रकलाबाईजवळ झटापटीचा आवाज येत होता. चंद्रकलाबाईला पाहिले असता त्यांच्या डोक्यावरही पाय ठेवलेला दिसला. आम्हाला मारु नका काय पाहिजे ते घेवून जा असे श्रीपत पाटील यांनी सांगितले. दरम्यान चंद्रकलाबाईच्या तोंडाला दरोडेखोरांनी रुमाल बांधलेला होता. चंद्रकलाबाई यांच्या गळ्यात असलेली 15 ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ, हातातील 50 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या व चांदीचे 70 तोळे वजनाचे वाळे असे चोरट्यांनी बळजबरीने काढून घेतले होते. दरोडेखोरांनी एकूण साडेबारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे, किंमत 3 लाख 75 हजार रुपयांचे तसेच 70 तोळे वजनाचे चांदीचे वाळे ज्यांची किंमत 14 हजार रुपये आहे असा एकूण 3 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला. देगलूर पोलीसांनी या संदर्भाने भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 397, 354 नुसार गुन्हा क्रमांक 39/2023 दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास देगलूरचे पोलीस निरिक्षक मोहन माछरे यांच्याकडे देण्यात आला होता.
देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांच्या नेतृत्वात या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार सोहन माछरे आणि त्यांच्या पोलीसांनी काल दि.28 जानेवारी रोजी या प्रकरणातील पाच आरोपी विठ्ठल व्यंकट बोईनवाड रा.वसुर ता.मुखेड, बालाजी पंढरी सोनकांबळे रा.मंग्याळ ता.मुखेड, गौतम दशरथ शिंदे रा.वसुर ता.मुखेड, शेषराव माधवराव बोईनवाड रा.वसुर ता.मुखेड आणि शहाजी श्रीराम मोरताळे रा.मोरतळवाडी ता.उदगीर जि.लातूर अशी आहेत. यांना अटक केली होती. याबद्दलची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
28 जानेवारीच्या रात्री देगलूर पोलीसांनी या प्रकरणातील सहावा आरोपी साईनाथ नागन्नाथ मामीलवाड (28) रा.आंबुलगा यास अटक केली.या प्रकरणात गुन्हेगार असलेला शहाजी हा मयत चंद्रकलाबाईच्या बहिणीचा मुलगा आहे. त्यानेच विठ्ठल बोईनवाडला मिस्त्री काम करण्यासाठी श्रीपद पाटील यांच्या घरी पाठवले होत आणि श्रीपद पाटील यांच्या घरातील सांपत्तीक माहिती आणली होती आणि त्यानंतरच हा गुन्हा करण्याचा बेत रचला गेला. त्यामुळे पोलीसांनी आज न्यायालयात याप्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम 396 आणि 120(ब) वाढवले आणि सर्व सहा दरोडेखोर व मारेकरी यांना न्यायालयात हजर केले.पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांनी याप्रकरणाच्या तपासासाठी पोलीस कोठडीची का आवशकता आहे असे सविस्तर सादरीकरण केल्यानंतर न्यायाधीश श्रीमती खान यांनी सर्व सहा दरोडेखोर आणि मारेकऱ्यांना आठ दिवस अर्थात 6 फेबु्रवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/01/28/देगलूर-येथे-वृध्द-महिलेच/