नांदेड(प्रतिनिधी)-बीट क्वाईनमधून लवकर परतावा आणि मोठा परतावा मिळतो असे आमिष दाखवून माझी व इतरांची 30 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार झाली आहे. काही दिवसांपुर्वी बीट क्वाईन या क्रिप्टो करंसीचा दर 80 लाखांपर्यंत गेला होता म्हणे.
सुशीलकुमार केशवराव सिसोदीया रा.उस्मानपुरा औरंगाबाद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिंगापुर येथून एक कंपनी तयार करून गेन बीट क्वाईन डॉटकॉम या संकेतस्थळावर बीट क्वाईनमध्ये गुंतवणूक केली तर मोठा परतावा मिळतो असे आमिष दाखवून नोव्हेंबर 2016 ते ऑगस्ट 2017 या कालावधीत मला आणि इतरांना 36.1 बीट क्वाईन दिले. त्यांची किंमत 30 लाख 20 हजार रुपये आम्ही भरली. पण त्यातील परतावा आम्हाला मिळाला नाही. नांदेडच्या सीटी प्राईड हॉटेलमध्ये सुध्दा गुंतवणूकदारांच्या बैठक घेवून त्यांना हे आमिष दाखविण्यात आले होते. बीट क्वाईन या कंपनीचा संचालक अजय महेंद्र भारद्वाज व इतरांनी मिळून आमची फसवणूक केली आहे असे तक्रारीत म्हटले आहे.
विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 420, 120(ब) आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 च्या कलम 3 आणि 4 नुसार गुन्हा क्रमांक 40/2023 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गौड यांना या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. अजय महेंद्र भारद्वाज हा नांदेडमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे. त्यानेच बीट क्वाईनची कंपनी काढलेली आहे. या अगोदर सुध्दा अनेक गुन्हे दाखल झाले होते एका प्रकरणात अजय भारद्वाजला अटकपण झाली होती.
बीट क्वाईनचा संस्थापक भारद्वाज विरुध्द 30 लाख 20 हजारांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल