
नांदेड(प्रतिनिधी)-जुना मोंढा भागातील शारदा टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास गोळीबार झाला. या गोठीबारात एका युवकाच्या हाताला गोळी लागल्याची माहिती आहे. गोळी मारणारे दोन जण इतवारा पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.
प्रत्यक्षदर्शीनी सांगितलेल्या माहितीनुसार नांदेडच्या जुना मोंढा भागातील शारदा टॉकीजकडे जाणाऱ्या गल्लीच्या रस्त्यावर गोळीबाराचा आवाज झाला. गोळी सचिन कुलथे रा.पथक गल्ली नावाच्या युवकाला लागली आहे. गोळी हातावर लागली असे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार जुन्या वादातून हा गोळीबार झाला आहे. कोणी सांगतात पैशांचा विषय आहे, कोणी सांगतात जागेचा विषय आहे. पण गोळीबार होणे ही घटना भयंकरच आहे. गोळीबार करणाऱ्या लोकांची नावे गजानन बालाजीराव मामीडवार आणि त्याचा मुलगा हिनेश गजानन मामीडवार (15) असल्याचे सांगण्यात आले. गोळीबाराची घटना समजताच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक श्री.द्वारकादासजी चिखलीकर साहेब,पोलीस निरिक्षक भगवान धबडगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्यपोड, शिवसांब स्वामी, पोलीस उपनिरिक्षक शेख असद, गणेश गोटके, स्थानिक गुन्हा शाखेचे अत्यंत चाणक्ष पोलीस उपनिरिक्षक श्री.गोविंदरावजी मुंडे साहेब तसेच इतर अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. गोळी मारणाऱ्या पिता-पुत्रांना इतवारा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.या मामीडवार हे नामांकित व्यक्तिमत्व आहे.यांच्याविरुद्ध पूर्वी सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत.