नांदेड(प्रतिनिधी)-मांजरी ता.मुखेड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 50 हजारांचा ऐवज चोरला आहे. तसेच बिजलवाडी ता. देगलूर येथे एक घरफोडून चोरट्यांनी ऐवज लांबला आहे. दोन्ही घटनांमध्ये मिळून 1 लाख 87 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
हादगीराम काशीनाथ मंगळगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर 3 वाजता अज्ञात चार चोरट्यांनी त्यांच्या मांजरी ता.मुखेड येथील घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटत ठेवलेले 1 लाख 50 हजार रुपये रोख चोरून नेले आहेत. मुक्रामाबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
सरुबाई मलप्पा ईबितदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे बिजलवाडी ता.देगलूर येथील घरात 1 फेबु्रवारी ते 3 फेबु्रवारी दरम्यान त्या आपल्या कुटूंबियांसह मरखेल येथे गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. त्यातून रोख रक्कम, मनीमंगळसुत्र असा 37 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मरखेल पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शेख अब्दुल बारी अधिक तपास करीत आहेत.
दोन घरफोड्यांमध्ये 1 लाख 87 हजारांचा ऐवज लंपास