नांदेड(प्रतिनिधी)-पांडूरंग येरावारला मिच मारले आहे. तुझे पण तुकडे करून लातूरला पाठवून देतो अशी धमकी देवून 51 हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्याविरुध्द भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अरुण नारायण अंकुलवार हे नोकरी करणारे व्यक्ती आहेत. त्यांना 29 जानेवारी 2023 रोजी सकाळी 6.13 वाजता, 3 फेबु्रवारी 2023 रोजी सकाळी 8.56 वाजता मारोती जळबाजी चिंतले रा.शिवरोड खंडोबा चौक नांदेड यांनी अरुण अंकुलवारला फोन केले.त्यात चिंतले सांगतात 51 हजार रुपयांची खंडणी दे, तु मामा चौकातील कार्यक्रमाला येणार आहेस ना तुझे तुकडे करुन लातूरला पाठवून देतो, पांडूरंग येरावार सावकारला मीच मारले आहे असे म्हणाला. तेंव्हा अरुण अंकुलवारने त्यांचे नाव विचारले असता चिंतले म्हणाला की, नाव माहित पाहिजे असेल तर 1 लाख 1 हजारांची खंडणी द्यावी लागेल. अरुण अंकुलवार यांच्या कार्यालयात जाऊन सुध्दा त्यांना धमकी दिली. भाग्यनगर पोलीसांनी मारोती जळबाजी चिंतले विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 385, 387 नुसार गुन्हा क्रमांक 50/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार मंगनाळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
पांडूरंग येरावार सावकारला मीच मारले होते असे सांगत खंडणी मागितली