नांदेड(प्रतिनिधी)-एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला पकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जप्त केली आहे.
दि.27 जानेवारी रोजी एक वयोवृध्द महिला चांडक या देवदर्शनासाठी जात असतांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ईश्र्वरनगर भागातून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चांडक यांची तोडून नेलेली सोन्याची चैन जप्त केली. ही चैन दीड तोळे वजनाची आहे आणि तिची किंमत 60 हजार रुपये आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिध्देश्र्वर भोरे, पोलीस निरिक्षक डा्रॅ.नितीन काशीकर यांनी ही चैन शोधणाऱ्या पोलीस पथकातील पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, देविसिंग सिंगल, शेख अजहर, दत्ता वडजे, विष्णु डफडे यांचे कौतुक केले आहे.