रमाई जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेच्यावतीने शितल साठे व सचिन माळी यांचा नवयान महाजलसा

नांदेड(प्रतिनिधी)-माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्याच्यावतीने रमाई समारोह आयोजित केला आहे. या कार्यक्रमात शितल साठे आणि सचिन माळी यांचा संच आपल्या कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमात जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
नांदेड जिल्हा रिपब्लिकन सेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त 7 फेबु्रवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे माता रमाई यांचा जयंती सोहळा साजरा होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्‌घाटक रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे, कार्यक्रम अध्यक्ष नांदेड जिल्हाध्यक्ष संदीप मांजरमकर, भिक्खुसंघ अध्यक्ष भदंत पय्याबोधीजी थेरो, मार्गदर्शक प्रदेश सचिव श्रीपती ढोले यांची प्रमुख उपस्थिती आहे. या कार्यक्रमात शितल साठे आणि सचिन माळी यांचा संच नवयान महाजलसा नावाची आपली कला सादर करणार आहेत.
या कार्यक्रमात युवराज धसवाडीकर, किरण धोंगडे, सचिन निकम, अशोक देशमुख तरोडेकर, अनिल शिरसे, संतोषकुमार साळवे, मोहन लांडगे, विजय वाकोडे, युवराज बनसोडे, विवेक बनसोडे, डॉ.राजेश पंडीत, धनंजय मांजरमकर, ऍड.बाळासाहेब शेळके, प्रभु सावंत, माधव चिते, राहुल चिखलीकर, प्रशांत गोडबोले, नागराज ढवळे, गवळनताई कदम, सुभाषअण्णा रेड्डी, अंकुश सावते, विकास पकाने, रविंद्र सोनकांबळे, अशोक हनवते, भिमराव घुले, राजकुमार शितळे, पी.एस. भुरे, सुनिल भद्रे यांची प्रमुख पदावर उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन देशपाल गायकवाड, रोहन नरवाडे, अमोल पट्टेवाड, नंदु पोहरे, प्रफुल शिंदे, अनिल मोरे, शंकर थोरात, प्रदीप गायकवाड, रतन रणविर, शंकर शंकरवार, विजय अण्णपुर्वे, श्रीधर थोरवट, साई घाळे, शोभाताई खिल्लारे, सतिश लामतुरे, विश्र्वपाल अटकोरे, गौतम जोंधळे, नितीन पंडीत, विजय वाघमारे, मंगेश निवडंगे, नंदकिशोर ससाणे, प्रदीप खंदारे, कुणाल भुजबळ, भारत भिसे, संजय बहादुरे, लक्ष्मण वाठोरे, नरसिंग उदयकुसा हे करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *