नांदेड (प्रतिनिधी)- माता रमाई यांच्या 125 व्या जयंतीच्या ओचित्याने “शिक्षण हे एकमेव उन्नतीचे साधन आहे’ असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. गरीब, कष्टकरी, कामगार, वंचित, अशिक्षितांच्या चिमुकल्या पाखरांच्या पंखात मदतीचे बळ देण्याचा संकल्प सार्वजनिक भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष तथा आयोजक राहुल सोनसळे यांनी केला असून शालेय विद्यार्थाना मोफत शालेय बॅग किटचे वाटप या किटमध्ये वह्या, पेन, कंपास पेटी, पाणी बॉटल इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप मंगळवार दि.07 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता महावीर सोसायटी कमाणीच्या बाजूस डॉ.आंबेडकर नगर, नांदेड येथे हा सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून शिक्षण तज्ञ प्रा.डॉ. अनंत राऊत मराठी विभाग प्रमुख पीपल्स कॉलेज, नांदेड हे उपस्थित राहणार असून शिक्षणाची महती सांगणारे त्यांचे व्याख्यान ही होणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. राजू सोनसळे, प्रा. इंजि. राज अटकोरे, इंजि. प्रशांत इंगोले, प्रतिक मोरे, राहुल चिखलीकर, इलयाज पाशा राजूरकर, आकाश जोंधळे, राहुल घोडजकर, शुभम वट्टमवार, अभय सोनकांबळे यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या यशिस्वतेसाठी सौरभ खंदारे, कुलभूषण कांबळे, गोलू कांबळे, सतीश खंदारे, संकेत सोनकांबळे, अनुष सोनकांबळे, आदित्य मोरे, आदर्श वाघमारे, उमाकांत कार्ले, संघर्ष वावळे, गौरव जोंधळे आदी परिश्रम घेत आहेत.
