नांदेड(प्रतिनिधी)-परवा रात्री झालेला खून प्रकार काल सायंकाळी खून होता म्हणून सिध्द झाला आणि काही तासातच भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. खूनाचे कारण लिहिण्याची वास्तव न्युज लाईव्हची ताकत नाही.
शहरातील महारुद्र हनुमानमंदिर जवळ श्रीनगर भागातील एका घराच्या गच्चीवरून राधेशाम अग्रवाल (23) हा युवक गच्चीवरून पडला अशी खबर भाग्यनगर पोलीस ठाण्यात 7 फेबु्रवारी रोजी सकाळी 5.30 वाजता आली. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. सायंकाळी 5 वाजता नवीनच माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आणि त्यानुसार राधेशाम अग्रवालच्या पोटात चाकुचे घाव होते. त्यानुसार पोलीसांनी मग या सर्व प्रकरणाची चौकशी केली असता अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. तो धक्कादायक प्रकार लिहिण्याची वास्तव न्युज लाईव्हची सुध्दा ताकत नाही. याबद्दल झालेल्या खूनाच्या गुन्ह्याचा तपास भाग्यनगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे यांच्याकडे आहे.
काल खूनाबद्दलची माहिती प्राप्त होताच पोलीस निरिक्षक सुधाकर आडे, त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी घटनास्थळी घेतलेल्या माहितीनुसार आणि स्थानिक गुन्हा शाखेतील अधिकारी आणि अंमलदारांनी घेतलेल्या मेहनतीनंतर याच गल्लीत राहणारा आकाश पालीमकर (30) आणि आदिनाथ मोरे या दोघांनी राधेशाम अग्रवालचा खून केला होता. पोलीसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे. आकाश पालीमकर हा सध्या आपल्या कुटूंबासोबत हैद्राबाद येथे राहतो पण काही महिन्यांपुर्वी तो याच गल्लीत राहत होता आणि त्यावेळेस घडलेल्या प्रकारानंतर राधेशाम अग्रवालचा खून झाला.
संबंधीत बातमी….
https://vastavnewslive.com/2023/02/07/श्रीनगर-हद्दीत-23-वर्षीय-यु/