खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या सहकाऱ्याचा खून करून त्याचा अपघात झाला असा बनावट पणा करणाऱ्या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली सोयंके यांनी दोन दिवस अर्थात 10 फेबु्रवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
श्रीनगर भागातील हनुमान मंदिराजवळ 7 फेबु्रवारी रोजी मध्यरात्री एका युवकाचा खून करून त्याला गच्चीवरून खाली फेकून देण्यात आले. त्याच्या पोटात, छातीत, बरगड्यांमध्ये, दंडावर जखमा होत्या. सुरूवातीला हा अपघात असल्याचे दाखविण्यात आले. परंतू वैद्यकीय अहवालात हा खून असल्याचे सिद्द झाले. 8 फेबु्रवारी सायंकाळपासून भाग्यनगर पोलीस याबाबीचा छडा लावण्यात मेहनत घेत होते. त्यात त्यांना यश आले.
गोपाल रामराव लाडके यांच्या तक्रारीवरुन हा खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाग्यनगर पेालीस घटनास्थळी पोहचले तेंव्हा त्यांच्या सोबत लोकांनी केलेल्या चर्चेतून समोर आलेल्या बाबीनुसार आकाश शंकर पालीमकर (21) आणि त्याचा सहकारी आदीनाथ भगवंतराव मोरे (20) या दोघांनी मिळून राधेशाम मिठूलाल अग्रवाल (23) या युवकाचा खून केला होता. भाग्यनगर पोलीसांनी रात्रीच या दोघांना अटक केली.
या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे, पोलीस अंमलदार प्रदीप गर्दनमारे, हनवता कदम, किशोर हुंडे, रामचंद्र कळके, सुमेध पुंडगे, मारोती मुसळे, शेख युनूस आदींनी पकडलेल्या मोरे आणि पालीमकरला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड.मंगेश जाधव आणि सहाय्यक पोलीस सुशांत किनगे यांनी मांडलेला पोलीस कोठडीची युक्तीवाद मान्य करून न्या.सोनाली सोयंके यांनी मोरे आणि पालीमकरला दोन दिवस अर्थात 10 फेबु्रवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी..

https://vastavnewslive.com/2023/02/08/राधेशाम-अग्रवालचा-खून-कर/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *