नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालयाचे आदेश घेवून पैसे वसुलीसाठी गेलेल्या न्यायालयीन बेलीफाला मारहाण करून त्याला अपमानास्पद वागणूक देऊन सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी हंगीरगा ता. उमरी येथील एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.7 फेबु्रवारी 2023 रोजी दिवाणी न्यायालय उमरी येथील बेलीफ बी.जी.खांडरे हे आरडी क्रमांक 38/2022 मध्ये केशव संभाजी वाहिंदे रा.हगींरगा यांच्याकडून 79 हजार 152 रुपये वसुल करण्यासाठी गेले. न्यायालयाच्या आदेशानुसार पैसे दिले नाही तर केशव वाहिंदेची संपत्ती जप्त करायची होती. केशव वाहिंदेने श्रीराम सिटी युनियन फायनान्सकडून कर्ज घेतलेले होते. बेलीफ बी.जी.खांडरे तेथे गेल्यानंतर केशव वाहिंदेने यांनी त्यांना भिकारडे असे संबोधन करून ढकलून दिले. त्यानंतर बी.जी.खांडरे यांनी घडलेला प्रकार सविस्तर अहवालासह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर उमरी येथे सादर केला. त्यावर नंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बी.जी.खांडरे यांनी तक्रार दिली. उमरी पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 504 नुसार गुन्हा क्रमांक 26/2023 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार वृत्तलिहिपर्यंत बेलीफचा अपमान करणाऱ्या केशव वाहिंदेला अटक झाली नव्हती.
पैसे वसुलीसाठी गेलेल्या न्यायालयीन बेलीफाचा अपमान ; गुन्हा दाखल