नांदेड(प्रतिनिधी)-1 ऑक्टोबर रोजी उमरी तालुक्यातील सिंधी गावात पतसंस्थेत लुट करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हा शाखेने पकडल्यानंतर आज दि.11 फेबु्रवारी रोजी उमरीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.बी.रेडकर यांनी त्या गुन्हेगाराला 10 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.1 ऑक्टोबर 2022 रोजी सिंधी गावातील कै.व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेत दररोजचे कामकाज सुरू असतांना दुपारी 2 वाजेच्या सुमारास 6 ते 7 जण या पतसंस्थेत घुसले. त्यांनी तलवारीच्या धाकावर तेथून 2 लाखंापेक्षा जास्त रक्कम लुटून नेली. सिंधी गावकऱ्यांनी दरोडेखोरांपैकी मंजितसिंघ किशनसिंघ सिरपल्लीवाले (30) यास चांगलाच चोप देवून पकडले. त्यांनतर स्थानिक गुन्हा शाखेने या गुन्ह्यातील दुसरा दरोडेखोर बालाजी संभाजी महाशेट्टे (21) याच्या पायावर गोळीमारून त्याला पकडले होते. या गुन्ह्यात मकोका कायदा जोडण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. या प्रकरणात आजपुर्वी पाच गुन्हेगार पकडलेले आहेत. दोन अजून पकडायचे आहेत अशी माहिती पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांनी दिली.
काल शेख सोहेल शेख रज्जाक या युवकाला स्थानिक गुन्हा शाखेने पकडून उमरी पोलीसांच्या स्वाधीन केले. उमरीचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांनी सांगितले की, शेख सोहेल शेख रज्जाकला उमरी न्यायालयाने 10 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सिंधी ता.उमरी येथे दरोडा प्रकरणातील एकाला उमरी न्यायालयाने दहा दिवस पोलीस कोठडीत पाठविले