नांदेड(प्रतिनिधी)-कुबडा या प्रतिष्ठित व्यक्तीवर गोळी झाडून त्याचा जिवघेण्या प्रयत्न करणाऱ्या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजुम यांनी 14 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.9 फेबु्रवारी रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास ओली पार्टी करतांना झालेल्या प्रकरणातून शेख इरफान उर्फ कुबडा शेख गुड्डू याच्या पोटात गोळी लागली. ही गोळी मारणारे संतोष लक्ष्मण कर्णेवाड (30) आणि हरजितसिंघ उर्फ जितू लखविंदरसिंघ पन्नू हे दोघे होते.प्राप्त माहितीनुसार गोळी लागल्यावर शेख इरफान उर्फ कुबड्याला या दोघांनीच शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. शेख इरफानचे वडील शेख गुड्डूच्या तक्रारीवरुन कर्णेवाड आणि पन्नूविरुध्द विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. स्थानिक गुन्हा शाखेने कर्णेवाड आणि पन्नुला अटक केली.
आज पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोलीस उपनिरिक्षक रवि बुरकुले, पोलीस अंमलदार केंद्रे आणि डोईफोडे यांनी पन्नू आणि कर्णेवाडला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोघांना 14 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
प्रतिष्ठीत व्यक्ती कुबड्यावर जिवघेणा हल्ला करणारे दोन जण पोलीस कोठडीत