नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील बालाजीनगर भागात एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
गजानन चंद्रकांत येरमवार हे किराणा व्यवसायीक आहेत. त्यांचे घर बालाजीनगर येथे आहे. दि.3 फेबु्रवारीच्या सकाळी 7.30 ते 10 फेबु्रवारीच्या सायंकाळी 7.30 वाजेदरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेवून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले आणि त्यातील सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 1 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक रोडे यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
बालाजीनगरमध्ये 2 लाखांची चोरी