नविन नांदेड(प्रतिनिधी)-सिडको परिसरातील स्वामी समर्थ मंदिर देवस्थान सिडको येथे आमदार निधीतून संरक्षण भिंती साठी व सुशोभीकरण व भक्तांसाठी जलशुद्धीकरण केंद्र देण्याची मागणी नगरसेवक प्रतिनिधी ऊदय देशमुख यांच्या सह भक्तांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली असता आ. हंबर्डे यांनी दहा लक्ष रुपये निधी जाहीर केला.
सिडको परिसरातील स्वामी समर्थ मंदिर देवस्थान येथे आ.मोहनराव हंबर्डे यांनी भेट देऊन महाआरती केली या वेळी भाविक भक्तांनी मंदिर देवस्थान समितीच्या वतीने अडीअडचणी बाबत चर्चा केली, यावेळी भक्तांनी मंदिर परिसरात गुरूपौर्णिमा, जयंती उत्सव यासह अनेक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असल्याने संंरक्षण भिंत व सुशोभीकरण सह पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र आदी मागणी करून आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे निवेदन नगरसेवक प्रतिनिधी तथा युवा नेते ऊदय देशमुख, सुदर्शन कांचनगिरे,बंजरग भेडेकर,, नवनाथ पांडुरंग कांबळे,प्रविण अंमीलकंठवार,मुकेश बच्चेवार, बालाजी बोकारे,सुशिल कुलकर्णी,यांच्या सह वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे,गिरीधर मैड,पदाधिकारी व भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
या वेळी मंदिर परिसरातील पाहणी करून सुशोभीकरण सह संरक्षक भिंतीसाठी आमदार निधीतून दहा लक्ष रुपये निधी जाहीर केला.
स्वामी समर्थ मंदिर परिसरात संरक्षक भिंतीसंह सुशोभीकरण करण्यासाठी दहा लक्ष रुपये निधी-आ. हंबर्डे.