पुर्णा(प्रतिनिधी)-रस्त्यांचे काम सुरू करून केंद्र शासनाने चांगले केले आहे पण त्यातील गुत्तेदार, त्यांचे एजंट आणि त्या कामाशी संबंधीत व्यक्ती सर्वसामान्य नागरीकांसोबत आपण बाप झाल्यासारखे वागत आहेत. त्यातून बऱ्याच वेगवेगळ्या समस्या तयार होत आहेत. असाच एक प्रकार मौजे आडगाव लसीना येथे घडत आहे. शेत मालकाची परवानगी न घेता गुत्तेदार आणि त्याचे एजंट त्या जमीनीचा दुरूपयोग करत आहेत.
आडगाव लसीना येथे साबीरोद्दीन मुजोफोदीन रा.पुर्णा यांची गट क्रमांक 95 व गट क्रमांक 105 मध्ये एकूण 52 गुंठे जमीन आहे. त्यांनी तहसीलदार पुर्णा यांना दिलेल्या अर्जानुसार पुर्णा येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी भुसंपादन करणे नमुद असल्याची नोटीस तहसील कार्यालयाने पाठविली होती. त्यानुसार 15 एप्रल 2021 पर्यंत मुळ मालकीचे कागदपत्र सादर करायचे होते. त्यानंतर 22 एप्रिल 2021 रोजी आम्हाला उत्तर देण्यात आले की, आमची जमीन भुसंपादन केली जाणार नाही. कारण त्या जमीनवर रेल्वे उड्डाणपुल तयार होणार नाही हे पत्र महाराष्ट्र रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनने दिले होते.
तरी पण मागील दोन वर्षापासून माझ्या जमीनीवर मोठ-मोठ लोखंडी वस्तू टाकण्यात आल्या आहेत. उड्डाणपुलाच्या शेजारचा सर्व्हिसरोड तयार करण्याचे काम मागील 6 महिन्यापासून चालू आहे. याबाबत अधिकारी आणि गुत्तेदारांनी आम्हाला नोटीस किंवा तोंडी माहिती दिली नाही. सध्या हा रस्ता माझ्या शेतातून वळविण्यात आला आहे. यावरून मोठ-मोठी वाहने, उसाची वाहने जात आहेत. त्यामुळे माझ्या शेताचे नुकसान होत आहे. वेळोवेळी या बाबत गुत्तेदाराला विचारणा केली असता ते अरे-तुरेची भाषणा वापरत आहेत आणि राकीय नेत्यांकडून दबाव तंत्राची भाषा वापरत आहेत. तरी तहसीलदार साहेबांनी माझ्या शेताची पाहणी करून मला न्याया मिळवून द्यावा. गुत्तेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास या कामाचे अधिकाीर आणि गुत्तेदार यासाठी जबाबदारी असतील असे या अर्जात लिहिले आहे. या अर्जाच्या प्रति साबेरोद्दीन यांनी जिल्हाधिकारी परभणी आणि महाराष्ट्र रेल इंन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लि.मुंबई आणि पोलीस ठाणे पुर्णा यांना सुध्दा दिल्या आहेत.