नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकटे यांनी केलेल्या बदल्यांचे दोन वेगवेगळे वृत्त वास्तव न्युज लाईव्हने आज सकाळी प्रसिध्द केले होते. त्यानंतर प्राप्त झालेल्या सविस्तर माहितीनुसार 18 पोलीस निरिक्षक 25 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 42 पोलीस निरिक्षक अशा बदल्या झाल्या आहेत. त्यात विमानतळ पोलीस ठाण्यात साहेबराव नरवाडे, डॉ.नितीन काशीकर माहूर, अशोक अनंत्रे मुदखेड आणि रमेश वाघ यांना मुखेड तर जयप्रकाश गुट्टे यांना नायगाव येथे पाठविण्यात आले आहे.
एकूण 18 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात वास्तव न्युज लाईव्हने पुर्वीच्या वृत्तात उल्लेखीत न केलेली नावे पुढील प्रमाणे आहेत. पोलीस निरिक्षक अनिरुध्द सोपानराव काकडे-विमानतळ (विमानतळ सुरक्षा), सुर्यमोहन गणपतराव बोलमवाड-नियंत्रण कक्ष(पोलीस ठाणे भाग्यनगर), अशोक आबासाहेब अनंत्रे-नियंत्रण कक्ष (मुदखेड), रमेश चिमाजी वाघ-नियंत्रण कक्ष(मुखेड), जयप्रकाश काशीनाथ गुट्टे-नियंत्रण कक्ष(नायगाव), साहेबराव दगडोबा नरवाडे-जिल्हा विशेष शाखा(पोलीस ठाणे विमानतळ), नितीन भास्करराव काशीकर-शिवाजीनगर (माहुर) असे आहेत.
बदली करण्यात आलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक अजिनाथ भिमराव पाटील-नियंत्रण कक्ष (पोलीस ठाणे हिमायतनगर), गफार खलील शेख-लोहा(मांडवी), सुशांत गणपत किनगे-भाग्यनगर(सिंदखेड) भालचंद्र पद्माकर तिडके-सिंदखेड(मुक्रामाबाद), विश्र्वंभर अर्जुनराव पल्लेवाड-नियंत्रण कक्ष (माहूर),शिवाजी विश्र्वनाथराव लष्करे-जनसंपर्क अधिकारी(नांदेड ग्रामीण) असे आहेत.
संबंधीत बातमी..
https://vastavnewslive.com/2023/02/20/स्थानिक-गुन्हा-शाखेत-भंड/