नांदेड,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने आज मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव पदावर १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची नियुक्ती केली आहे.तरीही अजून बरेच वरिष्ठ आयपीएस अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
गृह मंत्रालयातील सचिव व्यंकटेश भट यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अपर पोलीस महासंचालक तथा गृह रक्षक दलात अतिरिक्त समादेशक पदावर कार्यरत १९९६ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी ब्रिजेश सिंह यांना मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव या पदावर नियुक्त केले आहे. तरीही आजच्या परिस्थितीत अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.