नांदेड(प्रतिनिधी)-शिवजयंतीच्या रात्री एका 16 वर्षीय युवकाला हल्ला करून पाच जणांनी त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी युवकाची परिस्थिती अत्यंत गंभीर स्वरुपात असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
दि.19 फेबु्रवारी रोजी सुरज मारोती गच्चे (16) हा युवक छत्रपती श्री.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मिरवणुका पाहत थांबला होता. त्यावेळी गोवर्धनघाटजवळ राहणारे प्रशांत आणि बिल्लो अशा दोघांनी त्याला अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ केली. त्यानंतर सुरज गच्चे आपल्या घराकडे जात असतांना प्रशांत, बिल्लो आणि इतर तीन अनोळखी युवकांनी त्याला आयुर्वेदिक कॉलेजसमोर रात्री 9.30 वाजता पकडले आणि त्याच्या उजव्या भकाळीत, डोक्यावर, मानेवर, खांद्यावर चाकुने हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
सुरजच्या तक्ररीवरुन याप्रकरणी गुन्हा क्रमांक 54/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 143, 147, 148, 149, 504, 506 सोबत भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
16 वर्षीय युवकावर जिवघेणा हल्ला