
नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी सारस बहुउद्देशिय सेवाभावी संस्था आणि शुभम कंस्ट्रक्शन यांच्याद्वारे आयोजित अन्नदान कार्यक्रमात अनेकांनी सहभाग नोंदवून छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली.
19 फेबु्रवारी रोजी छत्रपती चौकात हा कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. शुभम कंस्ट्रक्शन आणि सारस बहुउद्देशिय सेवाभावी संस्था यांनी असंख्य लोकांना अन्नदान वाटप केले. छत्रपती श्री.शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमात मेहनत घेणाऱ्यांचा आणि मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक तुषार नंदुरकर आणि मोहित चौधरी, श्रीनिवास पेठकर, पवन जोंधळे, विनय पवार, सुमेध नंदुरकर, हर्षद बेग, रोहित उल्लेवाड, अविनाश चवणे, सुशिल जोंधळे, बालाजी माळेगावकर यांनी परिश्रम घेतले.