मिसिंग संदर्भातील 80 मोबाईल पोलीसांनी जप्त केले ; काहींना दिले इतरांना घेवून जाण्याचे आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर विभागाने हरवलेले, गहाळ झालेले 12 लाख 82 हजार 900 रुपयांचे 80 मोबाईल पोलीसांकडे जमा आहेत. त्यातील काही मोबाईल मालकांना परत दिले आहेत.तसेच पोलीसांनी आवाहन केले आहे की, आपल्या आयएमईआय नंबरची खात्री करून मोबाईल सायबर पोलीस ठाण्यातून घेवून जावे.
नांदेड जिल्ह्यातून विविध ठिकाणावरून ज्यामध्ये बाजारपेठ, आठवडी बाजार, भाजी मार्केट, गर्दीचे ठिकाणे येथून मिसिंग या सदरात दाखल झालेल्या मोबाईचा शोध घेतला. त्यातील 12 लाख 82 हजार 900 रुपयांचे 80 मोबाईल सायबर विभागाने पकडले आहेत. त्यातील काही मोबाईल मालकांना आज पोलीस अधिक्षकांनी त्यांचे मोबाईल परत केले आहेत. इतर मोबाईल मालकांना पोलीसांनी आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या आयएमइआय नंबरची खात्री करून पोलीसांकडे जमा असलेले मोबाईल घेवून जावे.
ही सर्व कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, प्रशांत देशपांडे, सायबरचे पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे, पोलीस उपनिरिक्षक जी.बी.दळवी, सोपान थोरवे, पोलीस अंमलदार सुरेश वाघमारे, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, विलास राठोड, रेशमा पठाण, अनिता नलगोंडे, दावीद पिडगे, दिपक शेवाळे, मोहन स्वामी, किशोर जयस्वाल, काशीनाथ कारखेडे, व्यंकटेश सांगळे, सौरभ सिध्देवाड यांनी पुर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *