केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा नांदेड दौरा

नांदेड, (जिमाका) :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे 24 व 25 फेब्रुवारी 2023 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शुक्रवार 24 फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून हेलिकॉप्टरने सकाळी 10.45 वा. असर्जन नांदेड येथे आगमन. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे दिक्षांत समारंभास उपस्थिती. दुपारी 1 वा. विद्यापीठ परिसरातून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.15 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून गोकुळनगरकडे प्रयाण. दुपारी 4 वा. अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5.30 वा. गुरुद्वारा बोर्ड मैदान येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या कोनशिला कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6.50 वा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण व सायं 7 ते 7.30 वाजेपर्यंत राखीव. सायं. 7.45 वाजता कमल किशोर कदम यांच्या निवासस्थानी भेट. रात्री 8.30 ते 9 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा व विश्रांती.

शनिवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 10 वा. नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. हिंगोली येथून हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 3.50 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *