
नांदेड(प्रतिनिधी)-समाज माध्यमांचा वापर चांगल्या बाबीचे प्रसारण करण्यासाठी अस्तित्वात आहे. पण त्याचा दुरपयोग सुध्दा तेवढाच सुरू झाला.असाच काहीसा प्रकार एमजीएम महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने केला. त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्यांनी त्याला आज चोप दिला.नंतर विमानतळ पोलीसांनी एमजीएम गाठले आणि दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणी कोणतीही कायदेशीर प्रक्रियापुर्ण झाली नव्हती.
समाज माध्यमांवर आप-आपले मत प्रकट करून नागरीक नवीन समस्यांना तयार करतात. असाच काहीसा प्रकार एमजीएम महाविद्यालयातील एका तरुणाने 20 फेबु्रवारी रोजी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांच्याबद्दल समाज माध्यमांवर केलेल्या प्रतिक्रियेला इतर विद्यार्थ्यांनी गांभीर्याने घेतले. आज 23 फेबु्रवारी रोजी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकुर टाकणारा तो विद्यार्थी एमजीएम महाविद्यालयात आला असता इतर विद्यार्थ्यांनी त्याला चोप दिला. आक्षेपार्ह मजकुर टाकणारा तरुण देगलूर नाका परिसरातील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटना घडताच विमानतळचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे आणि त्यांचे अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार, आरसीपी पथक एमजीएम महाविद्यालयात पोहचले आणि परिस्थिती आटोक्यात आली. ताब्यात घेतलेल्या युवकांविरुध्द काय कायदेशीर कार्यवाही झाली याची माहिती वृत्तलिहिपर्यंत प्राप्त झाली नव्हती.