नांदेड(प्रतिनिधी)-जयभिमनगर येथील ज्येष्ठ नागरीक आणि भारतीय बौध्द महासभा नांदेड शहराध्यक्ष वामनराव चिखलीकर यांचे शनिवारी मध्यरात्री निधन झाले आहे. आज सायंकाळी 5 वाजता त्यांची अंतिम यात्रा जयभीमनगर येथून निघेल आणि गोवर्धनघाट स्मशानभुमीवर त्यांना निरोप देण्यात येणार आहे.
जयभिमनगर येथील उपासक, भारतीय बौध्दमहासभा नांदेड शहराध्यक्ष, श्रामणेर, बौध्दाचार्य, शहर शाखेचे संस्कारप्रमुख वामनराव चिखलीकर (75) यांचे शनिवारी मध्यरात्रीनंतरच्या 2 वाजता निधन झाले. आज 25 फेबु्रवारी शनिवारी सायंकाळी 5 वाजता त्यांची अंतिम यात्रा जयभिमनगर येथून निघेल आणि गोवर्धनघाट स्मशानभुमीवर त्यांना अंतिम निरोप देण्यात येणार आहे. रिपब्लिकन सेना युवा जिल्हाध्यक्ष राहुल चिखलीकर यांचे ते वडील आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा चिखलीकर कुटूंबियांच्या दुखात सहभागी आहे.
सामाजिक कार्यकर्ते राहुल चिखलीकर यांना पितृशोक