नांदेड(प्रतिनिधी)- भोकर येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक शफाकत आमना यांनी अपघातातील जखमीला आपल्या स्वत:च्या खाजगी गाडीतून उपचारासाठी दवाखान्यात पाठवले होते. याबाबत वास्तव न्युज लाईव्हने बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या विशेष पथकासह हिमायतनगर येथे एका गुटखा माफियाच्या गोदामातून जवळपास 40 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. अवैध धंदेवाल्यांसोबत कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही असे हे काम आमना यांनी केले आहे.
दोन महिन्यापुर्वी भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून विविध अवैध धंदेवाल्यांवर कार्यवाही करण्याचे सत्र सुरू होते. भोकरच्या सहाय्यक पोलीस अधिक्षक शफाकत आमना यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार भोकर येथे अवैध गुटख्याची विक्री होत आहे. त्यांनी आपल्या कार्यालयातील पोलीस अंमलदार, हिमायतनगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी महाजन, पोलीस अंमलदार राठोड यांच्यासह 26 फेबु्रवारीच्या रात्री 2 वाजेच्यासुमारास शहरातील बागवान गल्लीत एका ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या घरांमध्ये राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याचा अवैध साठा सापडला.62 ते 65 पोत्यांमध्ये हा प्रतिबंधीत गुटखा साठवलेला होता. पकडलेल्या गुटख्याबाबत अन्न व औषधी प्रशासनाला माहिती देण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाही होणार आहे असे हिमायतनगरचे पोलीस निरिक्षक दिरप्पा भुसनुर यांनी सांगितले आहे.
गुटख्याची कार्यवाही करण्यात एलसीबीचे डॉक्टर प्रशिक्षीक
शफाकत आमना यांनी आपल्या उपविभागात केलेली ही प्रतिबंधक गुटख्यावरील कार्यवाही प्रशंसनिय आहे. जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा जिल्हाभरात चालणाऱ्या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यात अत्यंत तरबेज असते आणि या ठिकाणी विशेष करून गुटखा या प्रतिबंधक तपासावर कार्यवाही करण्यात त्या शाखेतील एक डॉक्टर महाशय अत्यंत मोठे प्रशिक्षीक आहेत. नांदेडपासून 100 किलो मिटर अंतरावर असलेल्या या गुटख्यावरही त्यांचे नियंत्रण हवे असायला हवे होते. दुरभाग्याची बाब म्हणजे नांदेड शहरातील देगलूर नाका, वाजेगाव या ठिकाणी सुध्दा गुटखा माफियांचे मोठे गोदाम डॉक्टरांना दिसत नाहीत आणि दिसल्यावर ते नक्कीच त्या गोदामांचे भरपूर मोठे आणि महागडी शस्त्रक्रिया करण्यात तरबेज आहेत.
सहाय्यक पोलीस अधिक्षक शफाकत आमना यांनी जवळपास 40 लाखांचा गुटखा पकडला