नांदेड(प्रतिनिधी)-आज पहाटे 9 वाजेच्यासुमारास वजिराबाद भागातील देगाव चाळीत दोन गटात झालेल्या हाणामारीत तीन युवक जखमी झाले आहेत. वजिराबाद पोलीसांनी त्वरीत प्रभावाने घटनेच्या ठिकाणी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
आज सकाळी 9 वाजेच्यासुमारास देगाव चाळीमध्ये जुन्या काही तरी वादातून दोन गटांनी एकमेकांवर हल्ले केले. त्यात राष्ट्रपाल गोडबोले(24), रोहित गोडबोल (22) आणि सचिन कापुरे (20) हे तीन युवक जखमी झाले आहेत. राष्ट्रपाल गोडबोलेच्या डाव्या हातावर, रोहित गोडबोलेच्या डोक्यात आणि सचिन कापुरेच्या पोटात जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार घटनास्थळी गेले आणि पुढील अनर्थ टळला. जखमी असलेल्या तिघांना उपचारासाठी विष्णुपूरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देगावचाळीत दोन गटात हाणामारी