नांदेड(प्रतिनिधी)-पेालीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अत्यंत रहस्यमय वातावरणात मालकाला थांगपता न लागू देता त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारायला लावला. प्राप्त माहितीनुसार त्या ठिकाणावरून सहा लोक ताब्यात घेण्यात आले आहेत आणि दीड लाख रुपये रोख रक्कम सुध्दा ताब्यात आहेत. हा जुगार अड्डा कधीच बंद झाला नव्हता.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काल रात्री वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील आणि वेगवेगळ्या विभागातील काही पोलीस अधिकारी आणि काही पोलीस अंमलदारांना बोलावून घेतले आणि त्यातील एकाला जागेची माहिती दिली आणि त्या ठिकाणी छापा टाकण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात त्या पोलीस पथकाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शफी बिल्डरच्या 52 पत्यांच्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. या पोलीस पथकाने त्या ठिकाणातून सहा जणांना ताब्यात घेतले आहे आणि दीड लाख रुपये सुध्दा या पथकाने ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.सोबतच आता वृत्त प्रकाशित होतांना श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड ग्रामीणचे मालक पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेबांना आपल्या कक्षात बोलावले आहे अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्याचा कार्यभार सांभाळल्यापासून अवैध धंदे बंद करा असे आदेश वारंवार सर्व पोलीस ठाण्यांच्या संबंधीत अधिकाऱ्यांना दिलेले होते. तरीपण शफी बिल्डरचा जुगार अड्डा कसा सुरू होता. त्यावर अखेर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनीच धाड टाकायला लावली.
जुन्या पोलीस उपमहानिरिक्षकांनी आणि जुन्या पोलीस अधिक्षकांनी सांगल्यामुळे वाळूवर कार्यवाही नाही म्हणे..
मागील आठवड्यात नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी एका रात्री 11 वाजल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असर्जन वाळूघाट गाठले.त्या ठिकाणी रात्रीच्या गडद अंधारात वाळू तराफ्यांच्या माध्यमातून वाळू उपसा सुरू होता. त्यावेळी भागाच्या संबंधीत अधिकाऱ्याला बोलावून घेण्यात आले होते. तेंव्हा अबिनाशकुमार यांनी रात्रीच्या गडद अंधारात होणाऱ्या वाळू उपसाबद्दल विचारणा केली. तेंव्हा संबंधीत अधिकाऱ्यांनी त्यांना सांगिेतले होते म्हणे की, जुने पोलीस उपमहानिरिक्षक आणि जुने पोलीस अधिक्षक यांनी सांगितल्यामुळे या भागात अवैध वाळूविरुध्द कार्यवाही होत नाही. तेंव्हा मात्र अबिनाशकुमार यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला आणि त्यांनी ठणकावून सांगितले की, मागचे काही मला सांगू नका मी सांगत आहे तेवढेच काम करा. यावर सुध्दा आजपर्यंत काय झाले याची माहिती मात्र मिळाली नाही.
पोलीस अंमलदारांच्या सुध्दा वाळू गाड्या
अबिनाशकुमार यांनी एका असर्जन घाटवर पाहाणी केली. त्यांच्या हद्दीत 18 पोलीस ठाणे आहेत त्यातून जवळपास सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गोदावरी नदी वाहते आणि प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अवैध वाळू उपसा सुरू आहे. ज्यामुळे शासनाला मिळणारे महसुल बुडते पण पोलीसांच्या भाकरीवर तुप येते. यातही अनेक जागी अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या गाड्यांमध्ये बऱ्याच गाड्या पोलीस अंमलदारांच्या आहेत. त्यातील काही पोलीस अंमलदार हे तर स्थानिक गुन्हा शाखा नांदेड येथे कार्यरत आहेत. यावरही अबिनाशकुमार यांनी कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शफी बिल्डरच्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधिक्षकांच्या टीमची धाड