नांदेड(प्रतिनिधी)-महिला व बाल विकास विभाग, नांदेड व मिरॅकल फाउण्डेशन इंडिया, युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजीत बालकाशी संबंधित असणाऱ्या विविध घटकाचे एकत्रित प्रशिक्षण हे नांदेड येथे घेण्यात आले. सदरील प्रशिक्षणास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सचिव जिल्हा विधी सेवा प्रधिकरण श्रीमती डी.एम.जज , श्रीमती जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. कांगणे, जिल्हा परिविक्षा अधिकारी ऐ.पी. खानापूरकर, अध्यक्ष, बाल कल्याण समिती राजवंतसिंघ कदम्ब, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, तसेच प्रमुख प्रशिक्षक म्हणून श्रीमती सुमित्रा आष्टीकर, मिरॅकल फाउण्डेशन इंडियाचे उमेश मोरे,सागर शितोळे उपस्थिीत होते .
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बालकांच्या हक्काबाबत सविस्तर मार्गदर्शन प्रशिक्षणा दरम्यान केले प्रत्येक मुल हे आपले म्हणून मुलांच्या सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने काम करणे ही सर्वाची सामुदायिक जबाबदारी असून ती प्रत्येकाने प्रमाणिकपणे पार पाडावी असे जिल्हाधिकारी प्रशिक्षणादरम्यान सांगितले. कायदातील विविध तरतुदीनुसार प्रत्येकाने आपली भूमीका चोखपणे पार पाडावी. आपली जबाबदारी झटकण्याचे काम करू नये असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच ग्राम बाल संरक्षण समिती हया अधिक सक्षम करून प्रत्येक बालकासाठी प्रेमळ कुंटब मिळाले पाहिजे ही सर्वाची सामुहिक जबाबदारी आहे ती आपण मानवतेच्या दृष्टीने पार पाडण्याचे अवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले. सदरील प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षक म्हणून लाभलेल्या मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन प्रशिक्षणार्थांना केले. सदरील प्रशिक्षणाचे सूत्रसंचलन परिविक्षा अधिकारी एस.आर दरपलवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विद्या आळणे यांनी व्यक्त केले.
बालकांचे सर्वोत्तम हित जोपासणे ही सर्वाची सामुदायिक जबाबदारी-अभिजीत राऊत