31 डिसेंबर 2023 पर्यंत शासन सेवेतील वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढली
नांदेड(प्रतिनिधी)- कोरोना, सदोष मागणी पत्रे, पुरेशा जाहिरातील प्रसिध्द न करणे यामुळे स्पर्धा परिक्षांमध्ये ज्या उमेदवारांना भाग घेता आला नाही त्यांच्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत येणाऱ्या परिक्षांसाठी शासनाने दोन वर्षाची वय मुदतवाढ दिली आहे. हा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. यावर उपसचिव गिता कुलकर्णी यांची स्वाक्षरी आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने 75 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्याचे घोषित केेले आहे आणि त्या अनुशंगाने मागील कोरोनाकाळ, सदोष मागणी पत्रे, पुरेशा जाहिरातील प्रसिध्द न होणे या अनेक कारणांमुळे उमेदवारांचे शासकीय सेवेतील वय समाप्त झाले आणि त्यांना परिक्षा देता आली नाही.
अशा उमेदवारांसाठी सन 2016 च्या शासन निर्णयामध्ये असलेल्या वयोमर्यादेत 31 डिसेंबर 2023 पर्यंत शासनाने दोन वर्षाची वाढ केली आहे. केलेल्या वाढीनुसार मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष आणि खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष असे वयोमान निश्चित करण्यात आले आहे. सन 2016 च्या निर्णयात ही वयोमर्यादा मागास प्रवर्गासाठी 43 आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षांची आहे.
31 डिसेंबर 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी दोन वर्ष वय मर्यादा शितील राहिल.या शासन निर्णयापुर्वी सरळ सेवा भरतीच्या जाहिरातील प्रसिध्द झाल्या असतील त्यात सुध्दा या वयोमर्यादेच्या शितिलतेचा लाभ उमेदवारांना घेता येईल. हा शासन निर्णय राज्य शासनाने संकेतांक क्रमांक 202303031802146507 प्रमाणे शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
शासन सेवेत येणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर