नांदेड(प्रतिनिधी)- आज दुपारी तिरंगा चौकात असलेल्या किशोर मेडीकल या दुकानाला अचानक आग लागली. यात 13 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची खबर मालकाने दिली आहे.
आज दुपारी 12 वाजता तिरंगा चौकात असलेल्या किशोर मेडीकल या दुकानाला आग लागली. आगीची माहिती मिळताच वजिराबाद पोलीस आणि अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. अग्नीशमन दलाने केलेल्या प्रयत्नानंतर सुध्दा या दुकानात 13 लाखांच्या औषधी आणि 15 हजार रुपये रोख रक्कम असे नुकसान आगीने केले आहे. मेडीकलचे मालक बाळासाहेब प्रकाश इंगळे यांनी या बाबतची त्वरीत माहिती पोलीसांना दिली त्याची नोंद घेण्यात आली. या बाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे यांच्याकडे देण्यात आला आहे.