नांदेड(प्रतिनिधी)-चार अज्ञात माणसांनी एका युवकाचा चाकून हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार 5 मार्चच्या रात्री 8.30 वाजता घडला आणि नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा 6 मार्चच्या सकाळी 8.15 वाजता दाखल केला.
दि.5 मार्चच्या रात्री 8.30 वाजेच्या सुमारास नितीन प्रकाशराव परळीकर (39) आणि त्यांचे मित्र मकरंद दिनेश भायेकर (36) हे दोघे दुचाकी गाडीवर बसून शहरातील अशोक लिलॅंड शोरुम भगवानबाबा चौक विष्णुपूरी रस्ता या ठिकाणी अचानक त्यांच्यासमोर चार जण आले आणि तुम्ही आमच्यासमोर रस्त्यावर का आलात असे सांगून हुज्जत घातली. त्यातील सर्वांनी मारहाण करायला सुरूवात केली आणि एकाने त्याच्याकडील चाकु काढून मकरंद दिनेश भायेकरच्या मांडीत चाकु मारुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी मकरंद भायेकरवर उपचार सुरू आहेत.
घटना घडताच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस अधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, गुन्हेगारांचे कर्दनकाळ असलेले पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब, पोलीस उपनिरिक्षक माणिक हंबर्डे आदींनी घटनास्थळी भेट दिली आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीवर जिवघेणा हल्ला