
नांदेड(प्रतिनिधी)-घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस वाहनांमध्ये भरण्याच्या एका अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकून तेथून 28 सिलेंडर पकडले आहेत.जीवनावश्यक वस्तु कायदाप्रमाणे या ठिकाणी पकडलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती.
इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांना प्राप्त झालेल्या माहितीनंतर त्यांनी आपले सहकारी पोलीस निरिक्षक गणेश गोटके, रमेश गायकवाड, रहिम चौधरी, पोलीस अंमलदार दासरवाड, माने, मिलिंद नरबाग, धिरज कोमुलवार, वाय.के.कासार आदींना सोबत घेवून देगलूर नाका परिसर, टायरबोर्ड जवळील उमर कॉलनी येथे एक दुकान उघडायला लावले. या दुकानात 28 गॅस सिलेंडर होते. या ठिकाणी गॅस सिलेंडरमधून त्यातील गॅस वाहनांमध्ये भरण्याची मशीन, वजन काटा असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीसांनी अब्दुल रहिम जुम्मा खान (23) या युवकास ताब्यात घेतले आहे. अब्दुल रहिमविरुध्द जीवनावश्यक वस्तु कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
