नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 23 वर्षीय युवकाला विमानतळ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी घडलेल्याप्रकारानुसार माधव रमेश जानोळे (23) या युवकाने आपल्या शेजारच्या पाच वर्षीय बालिकेला काही तरी खाण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत अतिप्रसंग केला. आपल्या बालिकेची अवस्था पाहुन तिचे आई-बाप तर हादरलेच. घटनाक्रम विमानतळ पोलीस ठाण्यापर्यंत गेला तेंव्हा विमानतळचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांनी त्वरीत प्रभावाने त्या लहान बालिकेला उपचारासाठी नेले. सोबतच अत्याचार करणारा माधव रमेश जानोळे (23) या युवकास सुध्दा ताब्यात घेतले आहे. वृत्तलिहिपर्यंत बालिका अद्याप दवाखान्यात आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया पुर्ण झाली नव्हती.
छोट्या-छोट्या बालिकांवर होणारे हे लैगिंक अत्याचार थांबविण्यासाठी समाजातच जागृती आणण्याची गरज आहे. असे अनेक गुन्हे दाखल होतात. अनेकांना अटक होते. त्या खटल्यांमध्ये भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार शिक्षा पण होते. प्रसार माध्यमे या संदर्भाच्या बातम्या प्रसिध्द करतात. तरी समाजात त्याचा प्रभाव का पडत नसेल हे घटना लिहितांना सुध्दा आमची लेखणी थरथरतच आहे.
पाच वर्षीय निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार; गुन्हेगार विमानतळ पोलीसांच्या ताब्यात