नांदेड(प्रतिनिधी)-22 फेबु्रवारीला जखमी झालेला युवक मरण पावल्यानंतर खूनाची तक्रार देण्यात आली. खून करणाऱ्या युवकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नागराज राजय्या चुंचे यांच्या मुलगा ईश्र्वर उर्फ बबलु नागराज चुंचे (25) या युवकावर बांधकामातील सेंट्रींगच्या लाकडाने सचिन रमेश शेळके (20) या युवकाने मारले. उपचारादरम्यान बबलु उर्फ ईश्र्वर चुंचेचा मृत्यू झाला. त्यानंतर आज नागराज चुंचे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मारहाण करणारा युवक सचिन शेळके विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल झाला.
शिवाजीनगर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक माणिक डोके यांनी सचिन रमेश शेळकेला आज न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यास 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/03/07/14-दिवसांपूर्बी-खून-करणारा/