पानटपरी टाकायची तर 10 हजार हप्ता द्यावा लागेल; जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-हॉटेलसमोर रस्त्यावर पानपट्टी टाकायची असेल तर पहिले 25 हजार आणि मग दर महा 10 हजार रुपये हप्ता द्यावे लागेल असे सांगून चार जणांनी एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. ईश्र्वर मारोतीराव हंबर्डे हे 7 मार्च रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास समाधान हॉटेल विष्णुपूरी समोर पानपट्टी टाकण्याची जागा सुनिश्चित करत असतांना तेथे प्रभाकर शंकर हंबर्डे, अविनाश भारती, मोन्या आणि संतोष उर्फ सोन्या असे चार जण आले. त्यातील प्रभाकर हंबर्डेने तुला येथे पान पट्टी टाकायची असेल तर अगोदर 25 हजार आणि त्यानंतर दरमहा 10 हजार रुपये असे हप्ते मला द्यावे लागतील असे सांगितले. जागा तुझ्या मालकीची नाही मग तुला पैसे कशाला देवू असे ईश्र्वर हंबर्डे म्हणाले. यावर त्या चौघांनी मिळून ईश्र्वरच्या शरिरावर खंजीरने अनेक दुखापती करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला . या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी चार जणांनाविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 384, 34 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25, 4/27 नुसार गुन्हा क्रमांक 159/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे ह्यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *