नांदेड(प्रतिनिधी)-एमआयडीसी सिडको भागात एका भुखंडावर बळजबरी ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात रमेश पारसेवार, कृष्णा शुक्ला आणि संग्राम राणे या तिघांना नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी अटकपुर्व जामीन नाकारला आहे.
21 फेबु्रवारी 2023 रोजी मध्यरात्रीनंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी एक गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याची घटना 18 जानेवारी 2023 रोजी रात्री 8.30 वाजता घडली होती. त्यामध्ये काही जणांनी एका भुखंडावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. त्या भुखंडाची मालकी कमल पत्रावळी यांची आहे. तीन दिवसानंतर का होईना हा गुन्हा क्रमांक 34/2023 दाखल झाला. त्यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 143, 146, 147,149, 323, 327, 447, 109, 504 आणि 506 सोबत मुंबई पोलीस कायदा कलम 135 जोडण्यात आले होते.
कमल पत्रावळी यांनी दिलेल्या तक्रारीत रामजनत बहादुर मंडळ, पांडूरंग बालाजी नळगे, कमल पत्रावळीच्या बहिणीचे पती संग्राम हरीचंद्र राणे, नांदेडमधील मोठे व्यवसायीक रमेश विश्र्वंभर पारसेवार आणि यांचे अत्यंत खास कृष्णा राजेंद्र शुक्ला यांच्या नावासह दहा ते 15 स्त्री पुरूष असे लिहिलेले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार यांच्याकडे आहे.
फेबु्रवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात रमेश विश्र्वंभर पारसेवार यांनी अटकपुर्व जामीन अर्ज क्रमांक 45/2023, संग्राम हरीचंद्र राणे यांचा अर्ज क्रमांक 48/2023 आणि कृष्णा राजेंद्र शुक्ला यांचा अर्ज क्रमांक 56/2023 दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या जामीन अर्ज प्रकरणात कमल पत्रावळी यांच्यावतीने ऍड.सय्यद अरीबोद्दीन यांनी काम पाहिले. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पोलीस कोठडीतील तपासाच्या आवश्यकतेला महत्वदेत न्यायाधीश बांगर यांनी या तिघांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/02/19/रमेश-पारसेवार-आणि-कृष्णा/