नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभरात अल्पवयीन बालकांकडून विविध प्रकारची वाहने चालविण्याच्या प्रकार दिसतात. मोटार वाहन काद्यानुसार अशा पालकांवर आणि त्यांना गाडी चालविण्यासाठी देणाऱ्या गाडी मालकावर कार्यवाही करण्याचे नियम आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी एकाच दिवशी 20 अल्पवयीन बालकांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही तर केलीच सोबत 12 वाहने सुध्दा जप्त केली.सांगली जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केेली ही कार्यवाही नांदेडसह राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये अंमलात आली तर अपघातांचे बरेच प्रमाण कमी होईल.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सांगली यांनी माहिती अधिकारी कार्यालय सांगली यांना पाठविलेल्या पत्रानुसार 2 फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी सांगली यांनी आदेश दिले की, जी अल्पवयीन बालके वाहने चालवत आहेत त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. त्यानुसार 18 वर्षापेक्षा कमी आणि काही वाहनांसाठी 16 वर्षापेक्षाा कमी बालकांनी वाहन चालविल्यास त्यांच्यावर आणि त्यांच्या पालकांवर कार्यवाही करण्याची मुभा आहे. या कार्यवाहीनुसार तीन वर्षाचा कारावास आणि 25 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा प्रस्तावित आहे. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तीन मार्च रोजी सांगली जिल्ह्यात 20 अल्पवयीन वाहन चालकांना पकडले अणि त्यांच्याकडील 12 वाहने जप्त केली आहेत. सोबतच अल्पवयीन पाल्यांना वाहने चालविण्यासाठी देणाऱ्या पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, मोटार वाहन कायद्यानुसार काम करा आणि दंडात्मक आणि फौजारी कार्यवाहीपासून स्वत:ला आणि आपल्या बालकांना वाचवा.
सांगली जिल्ह्यात झालेली ही कार्यवाही नांदेडसह सर्व राज्यभर राबविण्याची गरज आहे. कारण रस्त्यावर अनेकदा अल्पवयीन बालके गाडी चालवतांना दिसतात. पण त्यांची कोणी विचारणा करत नाही, त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही होत नाही, त्या अल्पवयीन बालकांच्या पालकांवर कार्यवाही होतांना दिसत नाही. नांदेड जिल्ह्यासह राज्यभरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालये, पोलीस विभाग, वाहतूक शाखा यांनी अशा कार्यवाहीवर भर देण्याची गरज आहे.
अल्पवयीन वाहन चालकांवर आणि त्यांच्या पालकांवर राज्यभरात कार्यवाही आवश्यक