नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती गॅस खुलेआमपणे ऍटोत

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी मागच्या आठवड्यात घरगुती गॅसचा वापर वाहनामध्ये करण्याचा अड्डा पकडला होता. आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत खुलेआमपणे घरगुती गॅसचा उपयोग करून ते गॅस ऍटो रिक्षामध्ये भरण्याचा धंदा जोरदारपणे सुरू आहे. कोणाचे असेल बर पाठबळ?
इतवारा पोलीसांनी मागील आठवड्यात त्यांच्या हद्दीत एका ठिकाणी धाड टाकून 28 गॅस सिलेंडर पकडले होते.त्या जागेच्या शेजारपासूनच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याची हद्द सुरू होते. या हद्दीमध्ये बिलालनगर भागात खुलेआमपणे घरगुती गॅस ऍटो रिक्षामध्ये भरला जात आहे. हा अवैधपणाचा धंदा कोणाच्या पाठबळाने सुरू असेल? ज्यांच्या बदलीच्या आदेशांनी गुन्हेगारांनी डोकेवर काढले अशा बातम्या छापून आल्या होत्या. पण अद्याप तरी गुन्हेगारांनी काही कमतरता त्या भागात ठेवलेली नाही. मग हा ऍटोमध्ये घरगुती गॅस भरण्याचा धंदा अत्यंत छोटीशी बाब आहे.
गॅस अड्डा सुध्दा पोलीस अधिक्षकांनीच पकडावा काय?
काही दिवसांपुर्वी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शफी बिल्डर यांच्या जुगार अड्‌ड्यावर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या टिमने अत्यंत गुप्तरितीने धाड टाकली होती. हा जुगार अड्डा सुध्दा कधी बंद होत नव्हता. म्हणजे त्या ठिकाणी पोलीस अधिक्षकांनी धाड टाकली तर आज नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिलालनगरमध्ये सुरू असलेल्या अवैधपणे घरगुती गॅस ऍटोमध्ये भरण्याच्या धंद्यावर सुध्दा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनीच धाड टाकावी काय?असा प्रश्न समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *