मनपाने अनाधिकृत 269 बॅनर काढले ; आता गुन्हे दाखल होणार

नांदेड(प्रतिनिधी)-शहरात बॅनरमुळे होणारे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी शहरातील अनेक भागांमधील अनेक बॅनर काढून घेतले आहेत.
उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल असलेल्या जनहित याचिका क्रमांक 155/2011 मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरात बिना परवानगी जाहिरात फलक, होर्डींग, बॅर्नस बाबत त्या व्यक्तींवर योग्य कायदेशीर कार्यवाही करावी. त्या अनुशंगाने मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी 4 जुलै रोजी बैठक घेवून शहरात विद्रुपीकरण करणाऱ्या लोकांवर कार्यवाहीचे आदेश दिले.
त्यानुसार आज 5 जुलै रोजी क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 1 तरोडा अंतर्गत 69 अनाधिकृत फलक, क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 2 अशोकनगर अंतर्गत 136 अनाधिकृत फलक, क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 3 गणेशनगरअंतर्गत 14 फलक, क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4 वजिराबाद अंतर्गत 21 अनाधिकृत फलक तसेच क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 5 इतवारा अंतर्गत 11 अनाधिकृत फलक आणि क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6 सिडकोअंतर्गत 16 अनाधिकृत फलक असे एकूण 267 लहान मोठे बिना परवानगीचे अनाधिकृत जाहिरात फलक त्यांच्या फे्रमसह काढून घेण्यात आले आहेत. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, मालमत्ता व्यवस्थापक अजितपालसिंघ संधू यांच्या मार्गदर्शनात सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी हे फलक काढून घेण्याची कार्यवाही केली आहे. मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंधक अधिनियम 1995 नुसार अशा प्रकारांमध्ये आता गुन्हे दाखल करण्यात येतील त्यामुळे कोणीही अनाधिकृत, परवानगीशिवाय महानगरपालिका हद्दीत बॅनर, होर्डींग आणि फलक लावू नये असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *