नांदेड(प्रतिनिधी)-तुमच्या मुलीचे माझ्या मुलासोबत प्रेम संबंध आहे, तिचे लग्न माझ्यासोबतच करावे असे सांगत त्या व्यक्तीच्या मुलाने 23 वर्षीय युवतीला कोणते तरी विषारी औषध पाजून मारून टाकल्याचा प्रकार मौजे भोपाळवाडी ता.लोहा येथे 4 जुलै रोजी पहाटे घडला आहे. या प्रकरणात युवक आणि युवती या दोघांनी विष पिले होते. परंतू युवती मरण पावली आणि युवकावर सध्या उपचार सुरू आहेत.
लक्ष्मीबाई मारोती जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी सुप्रिया मारोती जाधव (23) या मुलीचे लग्न माझा मुलगा रोहिदास सोबत का करत नाहीत. अशी विचारणा केली. त्यावेळी रोहिदासने माझ्याशी लग्न का करत नाही म्हणून युवती सुप्रियाला बाथरुममध्ये नेऊन स्प्राईटच्या बॉटलमध्ये आणलेले कोणते तरी विषारी औषध पाजून तिचा खून केला आहे.
उस्माननगर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार गुन्हा क्रमांक 101/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्यात आपल्या प्रियसीसोबत विषय पिणारा रोहिदास पद्माकर जाधव (25) रा.भोपाळवाडी ता.लोहा याचे नाव आरोपी सदरात आहे. परंतू प्रेमी युगलाने सोबत विष पिल्यामुळे प्रेमीका मरण पावली आहे आणि प्रेमी दवाखान्यात उपचार घेत आहे. यागुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गजनान गाडेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
प्रेमी युगलाने विष पिले; प्रेमीका मरण पावली; प्रियकरावर गुन्हा दाखल