नांदेड(प्रतिनिधी)-अधिक श्रावण मास अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. हा सप्ताह दि.18 जुलै ते 25 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी जगद्गुरू, अनेक शिवाचार्य, संत, महंत व विद्वान मंडळीचे दर्शन, प्रवचनाचा लाभ होणार आहे. तसेच या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजनही यामध्ये करण्यात आले आहे.
अधिक श्रावण मास निमित्त नांदेड येथे विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय, महादेव पिंपळगाव पाटी अर्धापूर रोड, नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड शिवनाम सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन यात करण्यात येणार आहेत. यामध्ये पहाटे शिवपाठ, सकाळी ग्रंथराज परमरहस्य पारायण, प्रवचन, वचन साहित्य, दुपारी गाथा भजन, राज्यातील ख्यातनाम विद्वानांचे साहित्यीक मंडळींचे व्याख्यान, रात्री शिवकीर्तन आणि शिवजागर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचबरोबर आरोग्य शिबीर, शेतीविषयक माहिती, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परिक्षेच्या संदर्भाची माहिती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन यामध्ये करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व धर्मातील भाविक भक्तांनी हजारोंच्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन समस्त शिवचार्य गण वीरशैव लिंगायत समाज महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला श्री.ष.ब्र.108 सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदा, श्री.ष.ब्र.108 डॉ.विरुपक्ष शिवाचार्य महाराज मन्मथ धाम, श्री.ष.ब्र.108 सिध्दयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरा, श्री.ष.ब्र.108डॉ.विरुपक्ष शिवाचार्य महाराज मुखेड,श्री.ष.ब्र.108 शंकरलिंग शिवाचार्य महाराज हणेगाव, श्री.ष.ब्र.108 दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत, श्री.ष.ब्र.108 बसवलिंग शिवाचार्य महाराज कावालास, श्री.ष.ब्र.108 सिध्दलिंग महाराज देवणी यांची यावेळी उपस्थिती होती.
अधिक श्रावण मासनिमित्त अखंड शिवनाम सप्ताह्याचे नांदेड येथे आयोजन