नांदेड,(प्रतिनिधी) – पोलीस ठाणे भाग्यनगर येथे बेवारस असलेल्या ८२ दुचाकी गाड्यांचा लिलाव ४ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.या लिलावात जनतेने आपले उपस्थिती नोंदवावी असे आवाहन भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांनी केले आहे.
भाग्यनगर पोलीस ठाण्यात ८२ दुचाकी गाड्या अश्या आहेत की,त्यांच्या मालकीचे कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत तसेच त्या गाड्या आमच्या मालिकेच्या आहेत असे कोणीही म्हणत नाही.भाग्यनगर पोलिसांनी तहसीलदार नांदेड यांच्या सोबत पत्रव्यवहार करून त्या गाड्या जाहीर लिलावात विक्री करण्याची परवानगी मिळवली आहे.

त्यानुसार दिनांक ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तेथे पडलेल्या बेवारस दुचाकी गाड्यांचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे.जनतेने ह्या लिलावात सहभागी व्हावे,असे आवाहन पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांनी केले आहे.याबाबत काही माहिती हवी असेल तर कोणीही भाग्यनगर पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२६१३६४ वर कॉल करून माहिती घेऊ शकतात.