नांदेड (प्रतिनिधी)- एका चारचाकी गाडीत धारदार शस्त्र बाळगून चार जणांविरूद्ध भाग्यनगर पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून चारचाकी गाडी व हत्यार जप्त केले आहेत.
पोलीस अंमलदार हनवता सोपानराव कदम हे आणि त्यांचे सहकारी 7 जुलै रोजी रात्रीची गस्त करत असताना रात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांनी एक चारचाकी गाडी थांबविली. या गाडीमध्ये तपासणी केली असता धारदार शस्त्र सापडले. भाग्यनगर पोलिसांनी विशाल राजू कानोजी (भंडारी) वय 24, अमोल राजू कानोजी (भंडारी) वय 20 यांच्यासोबत दोन विधीसंघर्ष बालक अशा चार जणांना पकडले. या सर्वांविरूद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार गुन्हा क्र. 260/2023 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सय्यद यांच्याकडे देण्यात आला आहे.