देगलूर येथील अपंग प्रशिक्षण केंद्रात;31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) – दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत म.रा. व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग, मुकबधीर, मतिमंद, मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. या प्रशिक्षण केंद्रात शिवण कर्तनकला, कॉम्प्युटर अकॉऊटींग व ऑफिस ऑटोमेशन व वेल्डरकम फॅब्रिकेटर इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशितांची निवासची व जेवणाची विनामुल्य सोय केलेली आहे.

 

 

 

इच्छूक अपंग, मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी 31 जुलै 2023 पर्यंत प्राचार्य तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर येथे पत्रव्यवहार करावा किंवा समक्ष भेटावे. अधिक माहितीसाठी मो. 9960900369, 9403207100, 7378641136,9503078767 वर संपर्क साधावा, असे आवाहन कर्मशाळा अधिक्षक तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *