अर्धापूर,(प्रतिनिधी)- शाळेत रंगीत पाणी प्रश्न करून आलेल्या शिक्षकाने गोधळ घातल्यानंतर सायंकाळी त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे अर्धापूर येथील पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड यांनी सांगितले.
अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथील शाळेत शिंदे हे शिक्षक रंगीत पाणी (दारू) प्राशन करून आले.तेव्हा ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालून प्रश्नाची डोंगरे उभी केली. शिंदे यांच्या बोलण्यातील लकबीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.ग्रामस्थांनी त्यांना पोलीस ठाणे अर्धापूर दाखवले.
सायंकाळी पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,सध्या गुरुजी वैद्यकीय तपासणी साठी गेले आहेत.माझा पोलीस अंमलदार वैद्यकीय तपासणीचा अहवाल घेऊन आपल्या नंतर कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
संबंधित व्हिडिओ…