नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा युवक कॉंग्रेस कमिटीची बैठक नवामोंढा येथील जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात दि. 11 जुलै रोजी दूपारी घेण्यात आली. या बैठकीत कॉंग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते व नांदेड उत्तर कॉंग्रेस कमिटीचे महासचिव हंसराज काटकांबळे यांची युवक कॉंग्रेस उत्तर विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नांदेड उत्तर कॉंग्रेसच्या महासचिवपदी कार्यरत सक्रिय युवा कार्यकर्ते हंसराज काटकांबळे यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली.
यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश महासचिव तथा हिंगोलीचे प्रभारी प्रफुल सावंत, महापौर प्रतिनिधी ऍडव्होकेट निलेश पावडे, युवक कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, शहराध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, अतुल पेदेवाड, उत्तर विधानसभा अध्यक्ष विकी राऊतखेडकर, युवक कॉंग्रेसचेनांदेड तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्रतिनिधी श्याम कोकाटे पाटील, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संदीप सोनकांबळे, दीपक पाटील यांच्यासह युवक कॉंग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
