नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे लिंबगावच्या हद्दीतून एक 15 वर्ष 10 महिने वयाची अल्पवयीन बालिका 20 जून रोजी बेपत्ता झाली आहे. पोलीस जनसंपर्क विभागाने या बालिकेच्या शोधासाठी शोध पत्रिका प्रसिध्दीसाठी पाठविली आहे.
वर्षा भारत कांबळे रा.कासारखेडा यांनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार नितीन आगळे यांच्या आखाड्यावर काम करतात. दि.20 जून रोजी त्यांची मुलगी प्रतिक्षा भारत कांबळे हे सकाळी 8 वाजता एमएससीआयटी कोर्ससाठी भावसार चौक नांदेडकडे गेली. तिच्याकडे मोबाईलपण आहे. परंतू क्लासचा वेळ संपल्यानंतर सुध्दा ती घरी आली नाही. तेंव्हा पोलीसांकडे त्यांनी माहिती दिली. कोणी तरी अज्ञात व्यक्तीने तिला पळून नेले असावे अशी सुध्दा शंका अर्जात केलेली आहे. अल्पवयीन बालिका असल्याने लिंबगाव पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 363 प्रमाणे गुन्हा क्रमांक 85/2023 अज्ञात व्यक्तींविरुध्द दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक के.बी.केजगिर यांच्याकडे आहे.
या संदर्भाने लिंबगाव पोलीस ठाण्याणे पोलीस अधिक्षक कार्यालय येथील माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडे पाठविलेले माहिती व शोध पत्रिकेनुसार बेपत्ता झालेली मुलगी प्रतिक्षा भारत कांबळेचे वय 15 वर्ष 10 महिने आहे. उंची 155 से.मी. आहे. शरिर बांधा मजबुत आहे. केस काळे आणि लांब आहे. चेहरा लांबट आहे. प्रतिक्षाला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. प्रतिक्षा घरातून गेली त्यादिवशी तिने काळ्या रंगाचा टॉप, काळ्या रंगाचा पॅन्ट आणि पायात चप्पल परिधान केलेली आहे. पोलीसांनी उल्लेखीत केलेल्या या शोध पत्रिकेनुसार दिसणारी बालिका कोणास दिसली तर त्यांनी त्याबाबतची माहिती लिंबगाव पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक 02462-270033, लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांचा मोबाईल क्रमांक 9823288458 आणि पोलीस उपनिरिक्षक के.बी.केजगिर यांचा मोबाईल क्रमांक 8830763211 वर जनतेने माहिती द्यावी असे आवाहन लिंबगाव पोलीसांनी केले आहे.
15 वर्ष 10 महिन्याची बालिका बेपत्ता ; लिंबगाव पोलीसांनी जारी केली शोध पत्रिका