नांदेड(प्रतिनिधी)-यशवंत कॉलेजच्या एका स्वच्छतागृहात दोन समाजात तेढ तयार होईल असे आक्षेपार्ह लिखान समोर आल्यानंतर यशवंत कॉलेजमध्ये संताप व्यक्त झाला. शिवाजीनगर पोलीसंानी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील यशवंत कॉलेजमध्ये एका स्वच्छता गृहात दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पध्दतीचे शब्द लिखाण करण्यात आले. या बाबतची माहिती बाहेर पसरली तेंव्हा अनेक संघटनांनी यशवंत कॉलेजमध्ये जमाव करून त्याविरुध्द आक्षेप घेतला. त्याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलीसांना प्राप्त झाल्याबरोबर पोलीस निरिक्षक मोहन भोसले आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी हजर झाले. यशवंत कॉलेज प्रशासनाने आक्षेपार्ह लिहिलेले लिखाण सध्या मिटवून टाकलेले आहे. शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या अज्ञात गुन्हेगारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
यशवंत कॉलेजमध्ये दोन समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण