एलसीबीच्या डॉक्टरची वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगारावर धाड

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील डॉ.परमेश्र्वर चव्हाण यांनी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराची मोठी रेड केली आहे. त्यामध्ये 3 हजार 370 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक डॉ.परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र हॉटेलच्या बाजूला पिंपळाच्या झाडाखाली जुना मोंढा येथे राजेश किशोर रौत्रे (28) आणि कृष्णा विष्णुप्रसाद उपाध्याय (29) हे दोघे मिलन क्लोज नावाचा मटका जुगार खेळत आणि खेळवित होते. त्यांच्याकडून 3 हजार 370 रुपये रोख रक्कम जप्त करून फौजदार चव्हाण यांनी वजिराबाद पोलीसांना आव्हान दिले आहे. या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीसांनी भाग 6 मध्ये गुन्हा क्रमांक 277/2023 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार राठोड यांच्याकडे देण्यात आला आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्यात प्रभार स्विकारताच दबंग पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबंाड साहेबांनी सर्व अवैध धंदेवाल्यांना तंबी दिली होती की, माझ्या हद्दीत काहीच चालणार नाही तरी पण त्यांच्याच हद्दीत जुगारावर एलसीबीच्या परमेश्र्वर चव्हाण यांनी छापा टाकून दाखवून दिले आहे की, वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व काही सुरूच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *