नांदेड(प्रतिनिधी)-मुंबईमध्ये पोलीस असलेल्या नवऱ्यासह आठ जणांविरुध्द एका विवाहितेने तक्रार दिल्यानंतर कंधार पोलीसंानी गुन्हा दाखल केला आहे.
कंधार तालुक्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा नवरा तिरुपती बालाजी मुंडे हा मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई आहे. लग्न झाल्यानंतर शेती घेण्यासाठी 8 लाख रुपये व ऍटो मोबाईलसचे दुकान टाकण्यासाठी 45 लाख रुपये अशी मागणी करून तिच्या सासरच्या मंडळीने तिला मानसीक व शारीरिक त्रास दिला. या विवाहितेचा दिर सुध्दा यवतमाळ जिल्हा पोलीस दलात चालक शिपाई आहे. या फिर्यादीमध्ये तिरुपती बालाजी मुंडे, बालाजी मुंडे, वंचाळबाई बालाजी मुंडे, श्रीकांत बालाजी मुंडे, परमेश्र्वर बालाजी मुंडे, अनिता विकास कागणे, सविता रामचंद्र केंद्रे, रामचंद्र बालाजी केंद्रे यांची नावे आरोपी सदरात आहेत. कंधार पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 198/2023 दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार श्रीरामे यांच्याकडे देण्यात आला आहे.
दुसऱ्या एका घटनेत माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे लग्न झाल्यानंतर ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहुन पैसे आण म्हणून तिला उपाशी ठेवून मारहाण केली जात असे, शारीरिक व मानसिक छळ केला जात असे याबाबतची सुनावणी दक्षता समितीकडे झाल्यानंतर तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीत आरोपी या सदरात प्रफुल्ल प्रकाश राठोड (25), प्रकाश गेमसिंग राठोड(60), पंचफुलाबाई प्रकाश राठोड(55), विश्वजित पवार, अर्चना संदीप जाधव यांची नावे आरोपी या सदरात आहेत. या तक्रारीनुसार माहूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 74/2023 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राठोड यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
मुंबई आणि यवतमाळ येथील दोन पोलीसांसह आठ जणांविरुध्द विवाहितेची तक्रार ;माहूर येथे विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल